मॉस्को : रशियामधील 23 वर्षीय क्रिस्टिना ओझटार्क हिला मुलांची ऐवढी आवड आहे की तिला तब्बल 11 मुले आहेत. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे. विशेष म्हणजे, मी भविष्यात आणखी मुलांना जन्म देणार असल्याचे तिने म्हटले आहे. तिला भविष्यात 105 मुलांचं कुटुंब हवं आहे. तिने 6 वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर या मुलांना जन्म दिला नाही आणि सरोगसीच्या मदतीने इतर मुलांना जन्म दिला आहे.
लहान मुलं तर प्रत्येकाला आवडतात. त्यांचं एक हसू आपला सगळा ताण कमी करतं. पण हल्ली आर्थिक धोरणामुळे लोक छोटचं कुटूंब ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा एक अशी घटना समोर आली आहे. ज्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकणार. रशियामध्ये राहणारी 23 वर्षीय क्रिस्टिना ओझटार्क हिला मुलांची ऐवढी आवड आहे की तिला तब्बल 11 मुलं आहेत. सध्या सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच व्हायरस होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सगळ्यात विशेष म्हणजे ही 11 मुलंही कमी असून मी भविष्यात आणखी मुलांना जन्म देणार असून मला त्यांचीही आई व्हायचं असल्याचं क्रिस्टिनाने म्हटलं आहे. क्रिस्टीना म्हणाली की, मी सहा वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर मी या मुलांना जन्म दिला नाही आणि सरोगसीच्या मदतीने आम्ही इतर मुलांना जन्म दिला.
* 105 मुलं हवी आहेत
क्रिस्टीनाला भविष्यात 100 मुलांचं कुटुंब हवं आहे. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांना 105 मुलं हवी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही ऐवढ्या मुलांना जन्म देऊ की नाही माहिती नाही. पण आम्ही यासाठी नक्की प्रयत्न करणार असा निश्चय त्यांनी केला आहे.
क्रिस्टिनाचं कुटुंब जॉर्जियातील बटुमी इथं राहतं. क्रिस्टीना म्हणाली की, आम्ही ज्या ठिकाणी बटुमीमध्ये सरोगसीसाठी जातो तिथलं क्लिनिक आमच्यासाठी सरोगेट महिला निवडतात. आम्ही या महिलांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधत नाही किंवा त्यांच्याशी आमचा थेट संपर्कही होत नाही.