सांगली : माढ्यातून लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये, चंदक्रांत पाटलांनी पवारांना सांगलीत टोला लगावला. शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
“माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरसुद्धा टीका केली. ते सांगलीत बोलत होते.
“मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडाव लागलं. पक्षापेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शरद पवार गप्प का? असा सवाल विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सकाळी शरद पवार यांनी ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते. त्यांच्या बद्दल मी काय बोलणार, असा टोला लगावत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला होता. त्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे.
‘मी अलिकडे पवार साहेबांवर कमी बोलायचं ठरवलंय, पण पवार साहेबांना मी बोललो तर स्वस्थता मिळत नाही. पण ते आज बोलले आहेत. पण मला असं वाटतं. त्या बोलण्यापुरतंच म्हणायचं झालं तर पवारांना माढा लढावं लागलं. नंतर जिंकणार नाही म्हणून माढा सोडावं लागलं. त्यांनी मला शिकवू नये की, मी कुठं गेलो. पवारही मुंबईत शिफ्ट झाले. मतदान केंद्रावरचं त्यांचं नाव मुंबईत आहे. त्यामुळं पार्टीच्या हितासाठी… मी पार्टीचा शिस्त मानणारा आहे.
माझ्या पार्टी प्रमुखांनी निर्णय दिला. कोल्हापुरच्या ऐवजी पुणे लढवा. मी पुण्यात लढलो. तुम्हाला तर माढा लढणार म्हणून जाहीर करुन माघार घ्यावी लागली. आम्ही तर माघार घेतली नाही जाऊन फाईट दिली आणि जिंकलो तिथं…’ असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.