सांगली : आज १४ फेब्रुवारी! व्हॅलेंटाईन डे. या दिवशी किती जोडपी लग्न करतात सांगता येत नाही. त्यातच सांगलीतील एका भटजी बुवांनी व्हॅलेंटाईन डेला एक वेगळाच ‘स्वॅग’ दाखवला. एक भटजी बुवा पारंपरिक वेशात हातामध्ये बोर्ड घेऊन उभे राहताना दिसले. त्यावर ‘दम असेल नात्यात तर लग्न करा दणक्यात, तेही एक रूपयात..’ असं लिहिलं होतं. सांगली शहरातील हा प्रकार आहे. दरम्यान, याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
१४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे. या दिवसाचे महत्व काही वेगळे सांगायला नको. हा दिवस संपूर्ण जगात असंख्य प्रेमयुगल अतिशय जोरात साजरा करतात. अर्थात या दिवसाला भेटलेल्या प्रेमी जोडप्यांपैकी किती जोडपी लग्न करतात हे कुणीच सांगू शकत नाही. कदाचित हाच विचार करुन एका भटजी बुवांनी व्हॅलेंटाईन डेला एक वेगळाच स्वॅग दाखवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सांगली शहरात गर्दीच्या ठिकाणी एक भटजी बुवा त्यांच्या पारंपरिक वेशात हातामध्ये बोर्ड घेऊन उभे दिसले. अतिशय मजेदार असे भटजी बुवा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणाऱ्या कपल्सला डायरेक्ट मेसेज देत होते की ‘दम असेल नात्यात तर लग्न करा दणक्यात, तेही एक रुपयात..’ मजा म्हणजे त्यांनी एक नंबर सुद्धा बोर्ड वर लिहिला होता.
आता अशी कोणीतरी व्यक्ति शहराच्या मधोमध बोर्ड घेऊन उभी राहिली तर दंगा तर होणारच ना आणि तेच घडले. सगळ्यांना हे आधुनिक भटजी बुवा भलतेच आवडले. अनेक कपल्सने तेथे थांबून या भटजी बुवांबरोबर सेल्फीसुद्धा काढले. तर अनेक मुलींनी त्यांच्या प्रियकराला हा मेसेज दाखवत चिडवले सुद्धा.