गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. रूपाणी रविवारी एका सभेला संबोधित करताना चक्कर येऊन पडले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच कच्छचे खासदार विनोद चावडा आणि गुजरात भाजपचे संघटन महामंत्री भीखु भाई दलसाणीया यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
विजय रुपाणी रविवारी एका सभेला संबोधित करताना चक्कर येऊन पडले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी भाषण सुरु असतानाच स्टेजवल कोसळले. रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात त्यांचं भाषण सुरु होतं. भाषण सुरु असतानाच अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना सध्या सरकारी विमानातून अहमदाबादला नेलं जात आहे. ६४ वर्षीय विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ब्लड प्रेशर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विजय रुपाणी यांच्यावर सध्या यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुजरातमध्ये सध्या स्थानिक निवडणुकांचं वारं वाहत आहे. काही दिवसांपूर्वीच उमेदवार निवडीसाठी प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीला विजय रुपाणी यांच्यासह कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्यात गुजराजचे प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.