सोलापूर : खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने इंधन दरवाढ करुन जनतेचा विश्वासघात केला. या इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने आज पेट्रोल पंपापर्यंत चारचाकी गाडी ओढत नेऊन निषेध व्यक्त केला.
सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले यांची प्रमुख उपस्थितीत होती. ज्ञान प्रबोधीनी शाळा येथून सुपर पेट्रोल पंपापर्यंत चारचाकी गाडी ओढत नेऊन पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध केला, प्रतीकात्मक विश्वासघात आंदोलन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सत्तेवर आल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नसल्याचा आरोप यावेळी केला.
यावेळी विवेक कन्ना, तिरुपती परकीपंडला, अभी राठोड, गोविंद कांबळे, संजय गायकवाड, अभिषेक बंटी गायकवाड, किरण राठोड, अभीषेक गायकवाड, शाहु सलगर, सुभाष वाघमारे, राज जगजाप, मनोहर माचर्ला, सतीश संगा, आनंद पुंडा, नरेश महेश्वरम, राकेश मंथेन, अमोल माशाळे, धम्मदिप जगजाप, लालू सानी, बसु कोळी, सौरभ साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.