मुंबई : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रक्षा खडसे यांनी ट्विट करून याची माहिती दिली. ‘रात्री अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता माझा टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी, असं खडसे यांनी ट्विट केलं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी नुकतंच राज्यभर परिवार संवाद यात्रा केली होती. याला जोरदार प्रतिसाद देखील मिळाला होता. तसेच परवा राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.