अमरावती / अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यात शनिवारपासून संचारबंदी लावण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अनुक्रमे शैलेश नवाल व जितेंद्र पापळकर यांनी जारी केले. शनिवारपासून ३६ तासांसाठी ही संचारबंदी असेल. या काळात शहर व ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा बंद असतील, सकाळी ६ ते १० या कालावधीत दूध आणि भाजीपाल्याची दुकाने उघडी असतील.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांत संचारबंदीचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अनुक्रमे शैलेश नवाल व जितेंद्र पापळकर यांनी जारी केले. शनिवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३६ तासांसाठी ही संचारबंदी असेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या काळात शहर व ग्रामीण भागातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद असतील. दुकाने, माॅल, काॅम्प्लेक्स बंद असतील. चहा नाष्टा, पान टपऱ्याही बंद असतील. यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. सकाळी ६ ते १० या कालावधीत दूध आणि भाजीपाल्याची दुकाने उघडी असतील.
कोरोना रुग्णसंख्येने तीन ते चार महिन्यानंतर पहिल्यांदाच ५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात कोरोना वेगाने वाढत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर अमरावतीमध्ये शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन असणार आहे. तसेच अकोला, वाशिम, औरंगाबाद, बुलडाणा या ठिकाणी लॉकडाऊन नसला तरी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
यवतमाळमध्ये वाढता प्रादुर्भाव पाहता गुरुवारी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली. लग्न समारंभ, अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती अत्यंत मर्यादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २३७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.