मुंबई : अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.
या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत स्वराज्याचे सेनापती म्हणून शौर्य गाजविलेल्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्वतः प्रवीण तरडे यात हंबीरराव मोहिते यांची भूमिका निभावत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे असणार आहेत.