नवी दिल्ली : पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या भाजप नेत्या शाझिया इल्मी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार अकबर अहमद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ‘दिल्लीत वसंत कुंज येथे चेतन सेठ यांच्या पार्टीत माझा छळ केल्याबद्दल मी अहमद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. चेतन यांनी अहमद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांनी माझा अपमान केला. हिंदीत मला शिवीगाळ केली’, असे शाझीया यांनी म्हटले.
पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या शाझिया इल्मी यांनी बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार अकबर अहमद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दिल्लीत वसंत कुंज येथे चेतन सेठ यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमात अकबर अहमद यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप शाझिया इल्मी यांनी केला आहे. पोलिसांनी शाझिया इल्मी यांच्या तक्रारीवरुन अकबर अहमद यांच्याविरोधात कलम ५०६ (धमकावणे) आणि कलम ५०९ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाझिया इल्मी दिल्ली भाजपाच्या उपाध्यक्ष आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकार, प्रसिद्ध वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले आहे.
“मला या विषयाला जास्त प्रसिद्धी द्यायची नाही. माझ्यासोबत गैरवर्तन आणि माझी छळवणूक केल्याबद्दल मी अहमद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. चेतन सेठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी अकबर अहमद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते माझा अपमान करत होते. हिंदीमध्ये त्यांनी मला शिवीगाळ केली. असे लोक सुटता कामा नयेत, त्यांना अद्दल घडली पाहिजे” असे शाझिया इल्मी म्हणाल्या.
* दोन दिवसांनी तक्रार
“रात्री ११ च्या सुमारास अकबर अहमद यांनी पुन्हा शाझिया इल्मी यांना अपशब्द सुनावले. त्यामुळे भावनिक झालेल्या इल्मी यांना अश्रू आवरणे कठिण झाले, या सर्व प्रकारचा तिथे उपस्थित असलेल्या परदेशी पाहुण्यांनाही धक्का बसला. त्यानंतर इल्मी तिथून बाहेर पडल्या व सीआर पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली” अशी माहिती अधिकाऱ्याने तक्रारीच्या आधारावर दिली. पाच फेब्रुवारीला ही घटना घडली आणि सात फेब्रुवारीला त्यांनी तक्रार नोंदवली.