पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी आणखी 29 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. ते पुण्यात बोलत होते.
या मिळणाऱ्या निधीचा उपयोग गावातील शाळा सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी झाला पाहिजे, हा निधी सत्कारणी लावा, असे आवाहनही अजित पवार यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना केले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील गावांना देण्यात येणारे स्मार्टग्राम आणि आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार आज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी आणखी 29 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली. याआधी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मुबलक निधी मिळाला आहे. पण हा निधी समाजाचा असतो. त्यामुळे या निधीचा वापर हा गावे आणि शाळा सुंदर व स्वच्छ करण्यासाठी झाला पाहिजे. शिवाय या निधीतील पैसा हा सत्कारणी लावा आणि गावे स्वयंपूर्ण बनवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी पुणे जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला.
पवार पुढे म्हणाले, ‘पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचा निधीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसा गावाला मिळेल, याचा पालकमंत्री या नात्याने मी पालकमंत्री पाहत असतो. परंतु या निधीचा विनियोग गावकारभाऱ्यांनी चांगल्या कामासाठी करावा. निवडणुकीसाठी गावातील खालची-वरची आळी पालथी घालतो. पण निवडून आल्यानंतर ग्रामसेवकाला सहीसाठी सरपंच, सदस्यांना शोधावे लागते, असे होता कामा नये.