भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सिधी बस दुर्घटनेबाबत जाणून घेण्यासाठी सिधी येथे आले होते. प्रशासनाचा ढिसाळ कारभार त्यांना इथे जागोजागी बघायला मिळाला. दिवसभराच्या दौर्यानंतर जेव्हा ते ‘सर्किट हाऊस’मध्ये आराम करायला पोहोचले तेव्हा आराम तर झालाच नाही. उलट रात्रभर मुख्यमंत्र्यांना डासांनी हैराण करून सोडले. त्यामुळे मुख्यमंत्री हैराण झाले होते. रात्र वाईट गेली सकाळ तरी चांगली उजडेल, असे वाटले असतानाच एका घटनेने पहाटेच झोप मोड झाली.
अर्ध्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांची शाळा भरविली. रात्री अडीच वाजता डासनाशक फवारण्यात आले. पुढे डोळा लागलाही नव्हता आणि आवाजामुळे झोप उडाली. पहाटे 4 वाजता पाण्याची टाकी ‘ओव्हरफ्लो’ झालेली होती. स्वत: मुख्यमंत्री मोटार बंद करायला गेले. डास प्रकरणानंतर ‘सर्किट हाऊस’चे प्रभारी अभियंता बाबुलाल गुप्ता यांना निलंबित करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रशासन जर सतर्क असते, कर्तव्यतत्पर असते तर बाणसागर कालव्यातील बस दुर्घटना घडलीच नसती, अशी तक्रार येथील सर्वच नागरिकांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना केलेली आहे. त्यामुळे सिधीचे जिल्हाधिकारी रवींद्र चौधरी आणि पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.