लिमा : जीवघेण्या कोरोना लॉकडाऊनचे नियम मोडल्यानंतर फाइन बसतो, गुन्हा दाखल होतो किंवा अवाजवी पैशांच्या मागणी केल्याचे अनेक प्रकार देखील पहिले असतील पण एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम मोडला म्हणून थेट पोलिसानंच किस्स केल्याचा प्रकार समोर आला.
कोरोना व्हायरसच्या नियमांचं पालन न केल्यानं एका महिलेला पोलिसानं दंड लावण्याऐवजी किस्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ही धक्कादायक घटना पेरू इथल्या लीमा या शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ तिथल्या स्थानिक मीडियाने शेअर केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या तरुणीची माहिती तो आपल्या हातातील पावतीवर लिहून घेत आहे. त्यानंतर तिला दंड आकारण्याऐवजी किस्स करून सोडून देतो. डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या पोलिसाला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आहे.
या प्रकरणी लीमा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर गैरवर्तन करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.