नवी दिल्ली : लग्नात तंदुरी रोटी बनवताना त्यावर थुंकणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. मेरठमधील एका लग्नात एक कुक तंदुरी रोटी बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो रोटी बनवताना रोटी भट्टीत लावण्यापूर्वी रोटीवर थुंकताना दिसत आहे. यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. शिवाय त्याच्यावर कोरोना महामारी पसरवण्याचा आरोपही लावण्यात आला. या सर्व प्रकारानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला शोधून अटक केली.
सध्या सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती थुंकून रोटी बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपला संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील एका विवाह सोहळ्यातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, ही घटना उघडकीस येताचं पोलिसांना कळविण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण निळ्या रंगाच्या शर्टमधील व्यक्तीला भाकरी बनवत असताना त्यावर थुंकताना दिसत आहे. भाकरी बनवल्यानंतर ही व्यक्ती तंदूरमध्ये रोटी भाजण्यासाठी टाकताना दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या दरम्यान, तो आपल्यावर कोणी लक्ष तर ठेवत नाही ना? हे पाहत आहे. परंतु, कोणीतरी गुप्तपणे त्याचा व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ कुमार आयुष नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी या व्यक्तीवर संताप व्यक्त केला आहे.
व्हिडिओमध्ये दिसणार्या व्यक्तीचे नाव सोहेल आहे. सोहेल थुंकी लावून रोटी बनवत असताना घटनास्थळावरील उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेरठ पोलिसांनी सांगितलं की, या व्हायरल व्हिडिओचा तपास करण्यासंदर्भात संबंधित पोलिस स्टेशनला सूचना देण्यात आल्या आहेत.