पंढरपूर : माघ वारीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुंदर आरास करण्यात आली आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या सजावटीच्या सोबतीने गरुडाचं चित्रंही रेखाटण्यात आलं आहे. श्री रुक्मिणीमातेच्या मंदिरात कलश आणि श्रीफलाची आरास करण्यात आली आहे.
‘गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला’ असेच तोंडून शब्द पडत होते. माघवारीला विठुराया सजला मात्र वारक-यांविना पंढरी, गाभारा सर्व काही सुन्न वाटत होते.
माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पुजा मंदीर समितीच्या सदस्या अँड माधवी निगडे यांच्या उपस्थितीत तर श्री रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माघवारी जयाशुध्द एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
* पुण्याच्या भक्तांकडून एक टन फुलांची आरास
माघवारी जयाशुद्ध एकादशी निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सचिन चव्हाण, संदीप पाटील आणि युवराज सोनार (पुणे) या भक्तांनी आरास करण्यासाठी एक टन फुले पुरविली आहेत.