कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ‘हे वेळापत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरुन तयार केलं गेलंय की अमित शाहांच्या? त्यांच्या प्रचाराला सोयीस्कर ठरेल यासाठीच या तारखा बनवण्यात आल्या आहेत का?’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका 8 टप्प्यांमध्ये घेण्यात येतील, असं निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी साडेचार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. मात्र, मतदानाच्या आठ टप्प्यांवरुन ममता बॅनर्जी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ममता बॅनर्जी यांनी खडे बोल सुनावत विचारलंय की, हे वेळापत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरुन तयार केलं गेलंय की अमित शहांच्या प्रचाराला सोयीस्कर ठरेल यासाठीच या तारखा बनवण्यात आल्या आहेत का? जेणेकरुन ते आसाम आणि तमिळनाडूच्या निवडणुका संपवून बंगालकडे आपला मोर्चा वळवू शकतील? हे भाजपला फायद्याचं ठरणार नाहीये. आम्ही त्यांना नेस्तनाबूत करु, असं ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यामधील एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलंय की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संपूर्ण देशासाठी काम करायला हवं. ते निवडणुकांसाठी आपल्या सत्तेचा वापर करु शकत नाहीत. आम्ही पंतप्रधानांचं स्वागत करतो मात्र ते सत्तेचा दुरुपयोग करु शकत नाहीत, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.