सोलापूर : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने तौफिक शेख यांचा निवडणुकीतून पत्ता कट केला होता. मात्र त्या निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती, असे विधान काँग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी केले आहे. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तौफिक शेख एमआयएम सोडून महाविकास आघाडीतील घटक (राष्ट्रवादी) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे बेरजेचे राजकारण केले जात आहे.
* आता राष्ट्रवादीशी जवळीक
सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी 2014 मध्ये शहर मध्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवून काट्याची टक्कर दिली होती. मात्र सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढवली आहे.
त्यांच्या समर्थक नगरसेवकांना घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात 2014 ची निवडणूक एमआयएमकडून लढत कडवी टक्कर दिली होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तौफिक शेख यांनी मला मदत केली होती, असं विधान करून काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
* तौफिक शेख पूर्वाश्रमी काँग्रेसी
तौफिक शेख हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी नेते आहेत. त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या एकेकाळचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या तौफिक शेख यांची मदत विधानसभा निवडणुकीत झाली, असं विधान करून सोलापूरच्या राजकारणाला एक नवे वळण दिलं आहे. अवघ्या एका वर्षावर सोलापूर महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना भविष्यात प्रणिती शिंदे आणि तौफिक शेख एकत्र तर येणार नाहीत ना, अशा चर्चांना आता ऊत आला आहे.
” सोलापूरच्या विकासासाठी आम्ही अजितदादा, शरद पवार व प्रणिती शिंदे या सर्वांच्याच संपर्कात आहोत. जो पक्ष आमची कामे करेल, त्यांच्यासोबत जाणार आहोत”
– तौफिक शेख