मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मुंबईत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडगुस घालू शकतात. मात्र, शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचे संकट पुन्हा येतंय, असं दिसत असेल तर सर्व निवडणुका पुढे ढकला, असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
मनसेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला मनपाने परवानगी नाकारली होती. साध्य रयत विशेष करून मुंबई वाढत्या असलेल्या कोरोना रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर मनपाने ही परवानगी नाकारली आहे. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे म्हणाले या संदर्भात बोलताना म्हणाले की “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात राज यांनी संताप व्यक्त केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर राज म्हणाले, “खरं तर त्यांच्या मनात आहे की, नाही. फक्त आपलं संभाजीनगरसारखं करायचं. अशा प्रकारचे दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते? त्यांना असं बोलावं का वाटतं. इतकी वर्ष यांच्या हातातच सरकार आहे. मग का होत नाहीत या गोष्टी. या मुद्द्यात राजकारण कसलं. इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर होईल,” असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
* मी मास्क घालत नाही
पत्रकारांनी तुम्ही मास्क परिधान केला नाही असा सवाल केला. यावर उत्तर देताना मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं. मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय, असं उत्तर दिलं. “राज्यात अनेक कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांनाही गर्दी होते. सरकारचे मंत्री किंवा इतर लोकं गर्दी करून धुडगुस घालू शकतात. शिवजयंतीला, मराठी भाषा दिनी मात्र नकार दिला जातो. कोरोनाचं संकट परत येतंय असं वाटत असेल तर सर्व निवडणुकाही पुढे ढकलल्या पाहिजेत.