ब्राझीलिया : ब्राझिलचे स्टार फुटबॉलपटू पेले यांनी एक धक्कादायक विधान केले. ‘माझे अनेक महिलांशी संबंध आहेत. त्यामुळे मला किती मुले आहेत याबाबत काहीच सांगता येणार नाही’, असे त्यांनी म्हटले. पेले यांनी ब्राझिलला 3 फुटबॉल विश्वचषक मिळवून दिले आहेत. त्यांचा 3 वेळा विवाह झाला. त्यांच्या जीवनातील अनेक पैलू नेटफ्लिक्सच्या एका डाक्युमेंटरीमध्ये उलगडले आहेत. पेले हे जगभरामध्ये आणि फुटबॉल विश्वासाठी एक आदर्श चेहरा आहेत.
फुटबॉल विश्वातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पेले यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ब्राझीलला तीन फुटबॉल विश्वचषक जिंकून देणाऱ्या पेले यांच्या म्हणण्यानुसार त्याचे अनेक स्त्रियांशी प्रेमसंबंध होते आणि त्याला किती मुले आहेत हे माहित नाही.
पेले यांच्या जीवनावर आधारित नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्य उलगडली आहेत. यात पेले म्हणाले की तीन वेळा लग्न करूनही त्यांचे अनेक स्त्रियांशी प्रेमसंबंध होते त्यामुळे आपल्याला किती मुले आहेत हे माहित नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुढे बोलताना पेले म्हणाले, ‘मी माझ्या पत्नीला सांगितले होते की ते त्यांच्या नात्यात एकनिष्ठ राहिले नाहीत. माझ्या पत्नीला हे ठावूक होते की मी कधीच खोटे बोलत नाही.
80 वर्षीय पेले यांची तीन लग्न झाली आहेत. त्यांना 7 मुलेही असून या सात मुलांमध्ये सँड्रा मकाडेही हिचा देखील समावेश आहे. दरम्यान,पेलेने तिला नेहमीच मुलगी मानण्यास नकार दिला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सँड्रा मकाडे पेले आणि त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणीची मुलगी आहे.
ब्राझीलमध्ये पेले हे राष्ट्रीय नायक म्हणून आदरणीय आहेत. ते त्यांच्या कामगिरीबद्दल आणि फुटबॉलच्या खेळातील योगदानासाठी प्रख्यात आहेत. गरिबांची सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी धोरणांचे भक्कम समर्थन देखील त्यांनी केले होते.