Friday, September 22, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मृत खासदार मोहन डेलकरांवर होता भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी दबाव

Surajya Digital by Surajya Digital
February 28, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
मृत खासदार मोहन डेलकरांवर होता भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी दबाव
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : काही दिवसांपूर्वी दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकरांनी मुंबईत आत्महत्या केली. यावर सामनातून डेलकरांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलंय. डेलकरांनी भाजपत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसेच, एका नटाची आत्महत्या देशात खळबळ माजवते मात्र, सातवेळा निवडून आलेले खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणीच बोलत नाही. असंही सामनातून म्हटलं आहे.

सिल्वासा, दादरा- नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, अशी शंका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून राऊतांनी मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काँग्रेसनं तर भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर शिवसेनेनंही डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शंका व्यक्त केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.

* मोहन डेलकर आत्महत्या का करतील ?

मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही,’ असंही राऊत म्हणाले आहेत.

* ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली

मोहन डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आपल्याला विरोध करणारा राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, चळवळ यांची मानसिक कोंडी करून त्यांना आत्महत्येच्या कड्यावर न्यायचेच अशी काही योजना ठरली आहे काय? मोहनने आत्महत्या केली, तो खून नाही हे मान्य केले तर मग ती का केली?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Tags: #Pressure #onMohandelkar #tojoinBJP#मृतखासदार #मोहनडेलकरांवर #भाजपमध्ये #प्रवेशकरावा #यासाठीदबाव
Previous Post

वीज बिलांबाबत आंदोलने मग इंधन दरवाढीबद्दल गप्प का? लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही

Next Post

सैन्यभरतीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, तिघांना अटक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सैन्यभरतीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, तिघांना अटक

सैन्यभरतीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, तिघांना अटक

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

February 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
« Jan   Mar »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697