गुवाहाटी : चहाचा मळा व कामगार आसामच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त आसाममध्ये प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांनी सधारु टी स्टेट येथे चहाच्या मळ्यातील कामगारांशी संवाद साधत पारंपारिक पद्धतीने चहाची पाने खुडली. हे फोटो व्हायरल झाले आहेत. 126 जागांसाठी 3 टप्प्यांत मतदान होणार आहे. निकाल 2 मे ला जाहीर होईल.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आसाममध्येही निवडणूकांच्या प्रचाराचे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आसाम दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी आसाममधील ‘साधारु टी स्टेट’ या ठिकाणी भेट दिली आहे. त्यांनी चहाच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांची भेट घेतली. त्यानंतर चहाच्या मळ्य़ात काम करणाऱ्य़ा महिलांसोबत चहाची पानेही तोडली. आसाममधील प्रत्येक निवडणूकीमध्ये येथील चहाच्या मळ्यांध्ये काम करणारे मजूर राजकिय पक्षांच्या मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आसाममधील तेजपूरमध्ये सभा घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आसामच्या दौऱ्यात ४९ वर्षीय प्रियांका गांधी यांनी चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लखीमपूर भागाला भेट दिली. त्यांनी सधारु टी स्टेट या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली. दर निवडणुकीला येथील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात.आज प्रियंका यांची तेजपूरमध्ये एक प्रचारसभाही होणार आहे.
प्रियंका गांधी यांनी नीलाचल हिल्स येथील शक्तीपीठाला भेट दिली. य़ावेळेस त्या म्हणाल्या, ”बऱ्याच कालावधीपासून मला मंदीराला भेट द्यायची होती.आज अखेर माझी इच्छा पूर्ण झाली. मी माझ्या स्वता:च्या कुटुंबाबरोबर आसामी लोकांच्या भल्य़ासाठी प्रार्थना केली आहे,” असं त्यांनी म्हटलं. तसेच विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर, प्रियंका गांधी पत्रकांराना राजकारणाच्या बाबतीत नंतर कधीतरी बोलू असं म्हणाल्या. ”मी या ठिकाणी देवाचे दर्शन घेण्यासाठी आले आहे. देवाने मला अनेक गोष्टी दिल्या आहेत” अंस यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या.
आसामची विधानसभा सदस्य संख्या १२६ आहे. २७ मार्च, १ एप्रिल, आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यांत आसाममध्ये मतदान होणार आहे.