नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याच परदेश दौऱ्यावर गेले नाहीत. आता 16 महिन्यांनी मोदी येत्या 26 आणि 27 मार्चला बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत.परदेशवारीवरुन मोदी नेहमीच विरोधकांच्या आणि टीकाकारांच्या निशाण्यावर राहिले आहेत.
कोरोना संकटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याच परदेश दौऱ्यावर गेले नाहीयेत. आता देशात आणि जगात लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी तयार आहेत. कोरोना संकाटमुळे पंतप्रधान मोदींना कुठेही परदेश वारी करता आली नव्हती. मात्र, आता पंतप्रधान तब्बल 16 महिन्यांनंतर मोदी देशाबाहेर जाणार आहेत. मोदी आता येत्या 26 आणि 27 मार्च रोजी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अनेक कारणांमुळे दौरा चर्चेत
पंतप्रधान मोदींचा हा बांग्लादेश दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. पहिलं कारण हे आहे की बांग्लादेश आपला 50 वा स्वांतत्र्यदिन साजरा करत आहे. तसेच या दरम्यानच वंगबंधु शेख मुजीबुर्रहमान यांची जन्म शताब्दी वर्ष आहे. यासोबतच भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यान राजकीय नात्याचं 50 वं वर्ष आहे.
भारताच्या नेबरहुड फर्स्ट आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसीमुळेच आज भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यानचे नाते मजबूत आणि सौहार्दपूर्ण आहे. भारत नेहमीच बांग्लादेशची मदत करत राहिला आहे. कोरोना संकटादरम्यान भारताने बांग्लादेशला मदत करुन आणखी एक उदाहरण घालून दिलं आहे. 2020 मध्येच शेख हसीना सोबत झालेल्या व्हर्च्यूअल समिटच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी बांग्लादेश दौऱ्याची घोषणा केली होती.