कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या आपला विधानसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या असल्याचं समजतंय. या संदर्भात एनडीटीव्ही ने वृत्त दिलं आहे. यामध्ये विविध माध्यमांवर दाखवण्यात आलेल्या दृश्यामध्ये ममता बॅनर्जी यांना त्यांचे सुरक्षा रक्षक गाडीत उचलून ठेवत असल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आज हल्ला झाल्याचे वृत्त आहे. नंदीग्राममधील प्रचारादरम्यान माझ्यावर 4 ते 5 लोकांनी हल्ला केला, असा आरोप ममतादीदींनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अचानक काही लोक माझ्याजवळ आले आणि धक्काबुक्की केली, असे त्या म्हणाल्या. यात आपल्या पायाला गंभीर जखम झाल्याचेही त्या म्हणाल्या. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
ममता यांच्या पायाला जखम झाली आहे. ममता बॅनर्जी यांचा आज नंदीग्राम येथे दौरा होता. मात्र, या हल्ल्यानंतर त्या कोलकाता येथे परत आल्या आहेत. ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच पुर्वीचे सहकारी राहिलेले आणि भाजप मध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी निवडणूक लढवणार आहेत.