सोलापूर : महाशिवरात्रीनिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बा विठुरायासह बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमासह शेवंती आणि बेल पात्रांची मनमोहक सजावट केली आहे. सुमारे एक टन शेवंती फुले आराशीसाठी वापरण्यात आली आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण आणि उत्सवाच्या काळात रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पोषाखांच्या रंगसंगतीकडे देखील आवर्जून लक्ष दिले जात आहे. त्यामुळे विठुराया आणि श्री रुक्मिणी मातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* एक टन शेवंती फुले , बेलपत्रांचा वापर
महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात सुमारे एक टन शेवंती फुले तसेच बेलपत्रांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात आली आहे. बारा ज्योर्तिलिंगांच्या प्रतिमासह केलेली फुलांची आरास हे आजचे खास वैशिष्ठय आहे.
अनंत नंदकुमार कटप या भाविकाच्या वतीने ही आरास केली आहे. साई डेकोरेटर्स आणि शिंदे ब्रदर्स पंढरपूर तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी ही सजावट केली आहे.