नवी दिल्ली : येत्या एक वर्षात सर्व टोलनाके हटवले जाणार आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत आज ही घोषणा केली आहे. तसेच टोलच्या जागी जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्रवासी जेवढा रस्ते प्रवास करतील, त्यांच्याकडून तितकाच टोल घेतला जाणार आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, सरकार पुढील एका वर्षात सर्व टोल प्लाझा समाप्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. येणाऱ्या काळात टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जेवढा ते रस्त्याचा वापर करतील. अमरोहामधून BSP चे खासदार असणाऱ्या कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर जवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझा असण्याचा मुद्दा उपस्थित केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की गेल्या सरकारमध्ये रस्ते परियोजनेच्या कंत्राटामध्ये थोडी आणखी मलाई टाकण्यासाठी असे अनेक टोल प्लाझा बनवले गेले आहेत, जे टोल प्लाझा नगरपालिका हद्दीत आहेत, ते निश्चितच चुकीचं असून अन्याय करणारं आहे.
नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं की, आता जर या टोल प्लाझांना हटवायला जावं तर रस्ते बनवणारी कंपनी भरपाईची मागणी करेल. मात्र, सरकारने आता पुढील एका वर्षामध्ये सगळेच टोल समाप्त करण्याची योजना बनवली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटलंय की, टोल समाप्त करण्याचा अर्थ टोल प्लाझा समाप्त करणे असा आहे. आता सरकार अशा एका टेकनिकवर काम करत आहे, ज्यामध्ये तुम्ही हायवेवर जिथून याल, तिथून GPS च्या मदतीने कॅमेरा आपला फोटो घेईल आणि जिथून आपण हायवेवरुन उतराल तिथला एक फोटो घेईल. त्यामुळे थोडक्यात, जेवढ्या रस्त्याचा वापर होईल तेवढाच टोल आपल्याला भरावा लागेल.
आजपर्यंत अनेकदा टोल प्लाझांमुळे सातत्याने होणाऱ्या ट्राफिक जाम आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा सातत्याने उचलला गेला आहे. आता केंद्र सरकारने सर्व नॅशनल हायवेवर फास्टॅगच्या सुविधेला लागू केलं आहे. त्यामुळे रांगेत उभं न राहत ऑटोमॅटीक पद्धतीने टोल भरता येऊ शकतो.