ढाका / नवी दिल्ली : बांगलादेशच्या एका हिंदू गावावर हजारो लोकांनी सशस्त्र हल्ला केला. यावेळी जवळपास हिंदुंच्या ८० घरांची नासधूस करत घरातील वस्तू चोरुन नेण्यात आल्या. यामुळे गावातील हिंदू कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी गाव सोडून दुसरीकडे पळून गेले. हिफाजत-ए-इस्लामच्या कार्यक्रमात धर्मगुरुने हिंदुविरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर या गावातील एकाने फेसबुकवर निषेध केला. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांनी हा हल्ला केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याच्या अगोदरच बांग्लादेशात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. मुस्लिम कट्टरतावादी संघटना हिफाजत ए इस्लामच्या कार्यकर्त्यांनी अल्पसंख्य हिंदूंच्या गावावर सशस्त्र हल्ला करून जवळपास ८० घरांची जाळपोळ आणि तोडफोड केली आहे.
यामुळे पंतप्रधान मोदींनी लागू केलेल्या सुधारित नागारिकत्व कायद्याचे (सीएए) महत्व अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांच्या परस्परसंबंधांना मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बांग्लादेशात अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदू समुदायाचे जगणे मुश्कील झाल्याचे पुढे आले आहे.
बांग्लादेशात मौलाना मुफ्ती मामूनल याने बांग्लादेशाचे निर्माते वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांची प्रतिमा लावण्यास विरोध केला होता. त्यांच्याविरोधात मुस्लिमांनी एकत्र यावे, असेही आवाहन या मौलानाने केले होते. त्याविरोधात शल्ला उपजिला येथील एका हिंदू युवकाने फेसबुक या समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये वंगबंधूंच्या प्रतिमेस विरोध करणाऱ्या मौलाना मामूनलवर टीका केली होती.
त्यावर हिफाजत ए इस्लाम या संघटनेचे शेकडो कार्यकर्ते शस्त्रांसह नागांव या हिंदूंची वस्ती असणाऱ्या गावावर चालून गेले. त्यांनी हिंदूंवर हिंसक हल्ले चढविले आणि घरांची नासधूस केली. यामध्ये सुमारे ८० घरांमध्ये लूटमारही करण्यात आली आहे. यामुळे गावातील हिंदूंना आपले घरदार सोडून जीव वाचविण्यासाठी पलायन करावे लागले आहे, अशी माहिती तेथील हबीबपूर युनियनचे अध्यक्ष विवेकानंद मजुमदार बाकुल यांनी दिली आहे.