मुंबई : क्रिकेटर पृथ्वी शॉ एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. प्राची सिंह असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. प्राची अभिनय क्षेत्रात नवीन आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात कलर्स टिव्हीवरील ‘उडान’ या मालिकेतून केली होती. तिने यात वांशिका शर्माची भूमिका केली होती. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसतात. यावरुनच चाहत्यांनी दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा अंदाज बांधलाय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
क्रिकेटर पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंगच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. पृथ्वीच्या वाढदिवसावेळी प्रीतीने त्याचे फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते. तसेच, आयपीएल 2020 च्या वेळी पृथ्वीने काही फोटो इन्स्टावर पोस्ट केले होते. ज्यावर प्राचीने “हाहाहा, मला या हसण्याची आठवण येत होती. क्युटी, आधीपेक्षा खूप जास्त.” अशी कमेंट केली. ते पाहून चाहत्यांनी अंदाज बांधला की दोघे एकमेकांच्या प्रेमात आहे.