नवी दिल्ली : राज्यात सचिन वाझे तसेच विविध मुद्द्यावर विरोधकांनी आघाडी सरकारला घेरले आहे. त्यातच आता विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील बडे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला नवी दिल्ली येथे पोहचले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
साखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एका शिष्टमंडळासोबत भेट घेतली, अशी माहिती ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
साखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह जी यांची भेट घेतली.@AmitShah pic.twitter.com/bAebpIxik3
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 17, 2021
तसेच शाह यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे – पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, पृथ्वीराज देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल आदी नेत्यांचा समावेश होता.
मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेणं यापाठीमागे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत. तसंच या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात देखील काही मिनिटे गुफ्तगू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत घडामोडींच्या अनुषंगाने शहा-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा कयास बांधण्यात येत आहे.