जळगाव : जळगाव महापालिकेत भाजपला धक्का बसला आहे. महापौर निवडणुकीत आज शिवसेनेने विजय मिळवला आहे. भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यांना ४५ मते मिळाली. दरम्यान शिवसेनेचा विजय जळगावमधील भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासाठीही धक्का समजला जात आहे.
पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. सेनेच्या उमेदवार जयश्री महाजन या महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा पराभव माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात आहे. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांना ४५ मते तर भाजपाच्या प्रतिभा काप यांना ३० मते मिळाली. शिवसेने उमेदवाराचा १५ मतांनी विजय झाला असून जळगाव पालिकेतून पुन्हा एकदा भाजपा हद्दपार झाली आहे.
जळगाव पालिकेत भाजपला शिवसेना जोरदार ‘दे धक्का’ दिला आहे. महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज ऑनलाइन पद्धतीने निवडणूक झाली. मात्र भाजपाचा एक गट निवडणुकांपूर्वी शिवसेनेला जाऊन मिळल होता. त्यामुळे जळगावात पुन्हा एकदा सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली होती.
जळगाव मनपाची निवडणूक असली तरी ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीने पार पडली अनेक नगरसेवकांनी मुंबईतून या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. अनेक नगरसेवकांनी ठाण्यातून आपला सहभाग नोंदवला होता. तसेच अनेक नगरसेवक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते अशी बातमी समोर येत होती.