सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यात एका विधवा महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला होता. याप्रकरणी तरूणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरुण ऊर्फ बाबू सुनील जमदाडे (वय 20) असं आरोपी तरूणाचं नाव आहे. ही घटना 9 फेब्रुवारी 2020 रोजी घडली होती. न्यायालयाने बलात्कार प्रकरणी आरोपीला कलम 376 नुसार जन्मठेप, कलम 506 नुसार 7 वर्ष सश्रम कारावास, कलम 377 नुसार 10 वर्ष सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन विधवा महिलेवर बलात्कार केल्याबद्दल सोनवडे (ता. शिराळा) येथील तरुणाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. अरुण ऊर्फ बाबू सुनील जमदाडे (वय 20) असे त्याचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी ही शिक्षा सुनावली.
ही घटना 9 फेब्रुवारी 2020 रोजी घडली होती. त्यादिवशी सायंकाळी ती महिला कामावरून घरी निघाली होती. त्यावेळी आरोपी जमदाडे याने तिला रस्त्यात अडविले. तिचा पाठलाग केला. तिला मारहाण केली. तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्या महिलेने कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी जिल्हा न्यायालयात जमदाडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. रणजित पाटील यांनी काम पाहिले. न्यायालयाने बलात्कार प्रकरणी आरोपीला दोषी धरून कलम 376 नुसार जन्मठेप, कलम 506 नुसार 7 वर्षे सश्रम कारावास, कलम 377 नुसार 10 वर्षे सश्रम कारावास व दंड अशा शिक्षा सुनावल्या. सरकारी पक्षाला सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे व पी.जी.आपटे यांनी काम पाहिले.