मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रश्मी ठाकरे यांची सोमवारी रात्री कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या सध्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन झाल्या आहेत.
मुख्यमंत्री पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. त्यामुळे राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा विळखा आता मुख्यमंत्र्यांच्या घरालाही पडल्याचं दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.
काही दिवसापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.