मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. महाराष्ट्रात ‘अर्थपूर्ण’ चर्चेतून बदल्यांचे निर्णय होत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती पेन ड्राइव्हमधून केंद्रीय गृहसचिवांना दिली. या घटनेनंतर काही तासांच्या आत महाराष्ट्रात ८६ पोलिसांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. राज्य सरकारने ज्या ८६ पोलिसांच्या बदल्या केल्या त्यात ६५ पोलीस फक्त मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचमधील आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याआधी पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
क्राईम ब्रांचमधील काही अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रियजुद्दीन काझी, सुनील माने आणि प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्यासह काम करत असलेले अधिकाऱ्यांच्या एनआयएकडून चौकशी सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असताना मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकारी आणि पोलीस ठाण्याच्या इतर २१ अशा ८६ अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे.