सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि इंधन दरवाढ कमी होत नाही तो पर्यंत आमचा एल्गार आमदार प्रणिती शिंदे यांनी पुकारला काँग्रेस भवनासमोर शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपोषण केले.
काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र भारतबंदच्या पार्शवभूमीवर आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त आंदोलना स्थळी तैनात करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यासाठी, कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणी साठि, तसेच पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडर दरवाढ रद्द करण्याच्या मागणी साठि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले आहे.
यावेळी यावेळी गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, नगरसेवक रियाज हुंडेकरी, शिवलिंग कांबळे, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, तौफीक हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, माजी महापौर अलका राठोड, आरिफ शेख, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर आदींची उपस्थिती होती.