सोलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येणारे वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी काल रात्रीतून अटक केली आहे. राजेश काळे यांच्यासह इतर दोघेही अटकेत आहेत.
गुरुवारी रात्री विजापूर नाका पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल झाला आहे. वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे उपमहापौर काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रकरणी उपमहापौर काळेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी काळे आणि इतर दोघांना अटक केली आहे.
उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांना यापूर्वी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजेश काळे यांची 13 जानेवारी 2021 रोजी भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.