कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे.
एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता. कुत्रा टॉयलेट ला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला, बाहेरून टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला. कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्यात जाऊन बसला. भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही.
बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.
वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला. आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही?
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर वन्यजीवअभ्यासकांनी असं उत्तर दिलं की वन्यजीव आपल्या स्वातंत्र्याविषयी अत्यंत संवेदनशील असतात. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची जाणीव होताच ते अत्यंत खोल दुःखात जाऊ शकतात, ते इतकं की त्यांची भूकेलाही विसरू शकतात. तिथे पोट भागवण्याची नैसर्गिक प्रेरणा मावळू लागते, इतकं मोठं पारतंत्र्यातचं दुःख आहे.
आपल्याला स्वातंत्र्याचं महत्व आणि त्याची किंमत अजूनही तितकी कळलेली दिसत नाही, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी साम्राज्यशाहीविरोधात आपल्या प्राणांची कुर्बानी दिली त्या शहीद भगतसिंहांची शहादत दिवसाची आठवण सरकारी स्तरावर झालीच नाही.
हे भयानक नाही तर भयानक हे आहे की ज्या भगतसिंहांनी साम्राज्यशाहीविरोधात हि शहादत पत्करली तिथे त्याच देशाचे लोक भांडवलदारांच्या, साम्राज्यवादी धोरणांच्या, खाजगीकरणाच्या, हुकूमशाहीसदृश्य सरकारी धोरणांच्या पारतंत्र्यात ढकलले जात आहेत.
भारतीय शोषणसंस्थेचा चेहरा हा इतर देशातील शोषणसंस्थेपेक्षा अधिक वेगळा आहे. तो जात, धर्म, वर्गीय स्तर व स्त्रीदास्य अशा कित्येक शोषणाने बरबटलेला आहे व म्हणून मुक्तीचे म्हणजेच स्वातंत्र्य अधिक गुंतागुंतीचे बनत आहे.
* महेंद्र लंकेश्वर