मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर काल (30 मार्च) रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत होता. हा त्रास अधिकच वाढल्याने पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.
रात्री शस्त्रक्रिया झाल्यानंतर सकाळी लगेच शरद पवार दवाखान्यात वर्तमानपत्र वाचत असतानाचा फोटो खासदार कन्या सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर टाकला. सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय Sharad Pawar साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत, अशी पोस्ट टाकली आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
प्रमुख शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना काल तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. दरम्यान हा त्रास अधिकच वाढल्याने पवार यांच्यावर रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरीश शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितले की, काही चाचण्या घेतल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली.
* शरद पवार काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार
शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितले की, ‘काही चाचण्या घेतल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे’. शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.