पॅरिस : फ्रान्समधील आतापर्यंत तब्बल 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या शाळांना तिथलं सरकार यासाठी निधी पुरवतं. 1992 मध्ये इथे शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यास सुरुवात झाली. पॅरिसमध्ये एड्सच्या रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळे ‘प्रेमाला हा, मृत्यूला ना’ अशी या मागची संकल्पना होती.
30 वर्षापूर्वी सुरु झालेली ही मोहीम आता 96 टक्केपर्यंत पोहोचली आहे.
प्रेमाचं शहर अशी ओळख असलेल्या पॅरिसमध्ये एड्ससारख्या रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळेच आपण विचारही करु शकणार नाही. त्यावेळी म्हणजेच 1992 मध्ये इथे शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यास सुरुवात झाली. म्हणजे जवळपास 29 वर्षापूर्वी शाळेमध्ये पहिलं कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यात आलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रेमाला हा, मृत्यूला ना (Love, yes; death, no) अशी या मागची संकल्पना होती. जवळपास 30 वर्षापूर्वी सुरु झालेली ही मोहीम आता 96 टक्केपर्यंत पोहोचली आहे. फ्रान्समधील 96 टक्के शाळांमध्ये ही मशीन्स बसवण्यात आली आहेत.
फ्रान्समधील तब्बल 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिग मशीन आहेत. हायस्कूल, पब्लिक आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या शाळांना तिथलं सरकार निधी पुरवतं. शिक्षण खात्याने केलेल्या सर्व्हेमध्ये फ्रान्समधील 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन असल्याचं समोर आलं आहे.
पूर्वी शाळांमध्ये कंडोम मशीन बसवण्याला फ्रान्समधील कट्टरतावाद्यांसह सर्वसामान्यांनीही विरोध केला होता. मात्र हळूहळू हा विरोध बारगळला आणि पुढे शाळांमध्ये कंडोम मशीन बसवण्याचं समर्थन जवळपास 83 टक्के लोकांनी केलं.