नवी दिल्ली : भारतात ATM कार्डविना ATM मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा येणार आहे. ATM मधून पैसे काढण्यासाठी UPI आयडी गरजेचे आहे. UPI पेमेंट ॲपच्या माध्यमातून ATM मधून पैसे काढता येतील. उदाहरणार्थ BHIM, PayTM, गूगल पे या UPI ॲपचा वापर ATM मधून पैसे काढण्यासाठी होणार आहे. यासाठी ICCW म्हणजेच इंट्रोपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल सोल्यूशन लॉन्च केले आहे. या माध्यमातून UPI च्या माध्यमातून ATM मधून पैसे काढता येतील.
देशात बँकिंग क्षेत्रात रोज अनेक बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर बँकिंग व्यवहार रोज साधा आणि सोपा होत चालला आहे. यापूर्वी बँक अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर एटीएम किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन पैसे काढावे लागायचे. एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम मशीनवर जाऊन ते आधी स्वाईप करावे लागायचे. मात्र, आता एटीएम कार्ड नसले तरी एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.
सुरुवातीला ही अशक्य असणारी गोष्ट आहे असे वाटेल. मात्र, भारतात सध्या एटीएम कार्डविना एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यानंतर आता जवळच्या फोनमध्ये असलेल्या यूपीआय अॅपच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील.
मिळालेल्या माहितीनुसार एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी यूपीआय आयडी असणे गरजेचे आहे. यूपीआय पेमेंट अॅपच्या माध्यमातून कोणत्याही एटीएम मशीमधून पैसे काढता येतील. उदाहरण सांगयचं झालं तर BHIM, PayTM किंवा गूगल पे या यूपीआय अॅपचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी होणार आहे. त्यासाठी एटीएम मशीनमध्ये अपग्रेडेशन केले जात आहे. एटीएम तयार करणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ICCW म्हणजेच इंट्रोपरेबल कार्डलेस कॅश विदड्रॉवल सोल्यूशन लॉन्च केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून यूपीआईच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील. यूनियन बँकेने एनसीआरमध्ये अशा प्रकारची सुविधा असणारे काही खास एटीएम इन्स्टॉल करणे सुरु केले आहे. बँकेने आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त एटीएम अपग्रेड केले आहेत.
एटीएममधून कोणत्याही कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर त्यासाठी आधी यूपीआय आयडी आणि कोणतेही यूपीआय अॅप असणे गरजेचे आहे. अपग्रेड केलेल्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर त्यासाठी आधी एटीएम मशीनकडे जावे लागेल. त्यानंतर यूपीआय अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एटीएमवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर फोनद्वारे कमांड दिल्यानंतर एटीएम मशीममधून पैसे निघतील आणि तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे कापले जातील.