जयपूर : भारतातील महाराणा प्रताप यांच्या तलवारीची गोष्ट असो किंवा टिपू सुलतानच्या तोफेची. या राजा-महाराजांची शान त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रांनीच होती. अशीच आता एका तोफेची माहिती जाणून घेऊयात. जी आशियात सर्वात मोठी आहे. तिचा वापर एकदाच झाला आणि तिचा वापर केल्यानंतर चक्क मोठा तलावच बनल्याचे सांगितले जाते. वाचूयात या तोफेची सविस्तर माहिती.
राजस्थान येथील एका किल्ल्यात ही तोफ आहे. जी केवळ एकदाच चालविली गेली. ती एकदाच चालली पण तिचा प्रभाव आजही एका तलावाच्या स्वरुपात बघायला मिळतो. ही तोफ आशियाखंडातील सर्वात मोठी तोफ आहे.
याचा आकार एवढा मोठा होता की, जेव्हा या तोफेला चालविण्यात आले तेव्हा, यामधून निघालेला गोळा हा ३५ किलोमीटर दूर एका गावात जाऊन पडला आणि तिथे चक्क एक तलाव बनला. सुरवातीच्या काळात या तोफांचा उपयोग दगड फेकण्यासाठी केल्या जात होता. ही तोफ आधी तांबा आणि कांस्य या धातूपासून बनविण्यात आली. १५ व्या शतकात ही तोफ ३० इंच परिघाच्या असायच्या आणि १२०० ते १५०० पाउंड वजनाचे दगडाचे गोळे यातून फेकण्यात यायचे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या तोफेचं वजन ५० टन आहे. ही तोफ किल्ल्याच्या डूंगर दरवाज्यावर ठेवण्यात आली आहे. या तोफेची नळीपासून ते शेवटच्या भागाची लांबी ३१ फुट ३ इंच आहे. म्हणूनच जेव्हा या तोफेतून गोळा सुटला तेव्हा तो जयपूरहून ३५ किलोमीटर लांब असणाऱ्या चाकसू नावाच्या क्षेत्रात जाऊन पडला. या तोफेच्या गोळ्याने बनलेल्या तलावात आजही पाणी आहे, हे इथल्या लोकांची पाण्याची गरज भागवत आहे.
या तोफेमध्ये ८ मीटर लांब बॅरल ठेवण्याची सुविधा आहे. म्हणूनच ही तोफ आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणून प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते ३५ किलोमीटर पर्यंत निशाना साधण्यासाठी या तोफेला १०० किलो गनपावडरची गरज असेल.
इतिहासकारांच्या मते या तोफेच्या वजनामुळे तिला कधीही किल्ल्याच्या बाहेर नेण्यात आले नाही. त्यामुळे तिचा कुठल्याही युद्धात उपयोग झाला नाही. या तोफेला केवळ एकदाच परीक्षण करण्याकरिता चालविण्यात आले. किल्ल्याच्या दक्षिण दिशेने ३५ किलोमीटर दूर असलेला तलाव हा याच तोफेच्या परीक्षण करताना निघालेल्या गोळ्यामुळे बनला आहे, असे सांगितल्या जाते.
लोखंडाची तोफ आल्यानंतर लोकांच्या लक्षात आले की दगडांऐवजी लोखंडाच्या गोळ्यांनी जास्त नुकसान पोहोचवता येते, त्यामुळे त्यानंतर लोखंडापासून तयार करण्यात आलेली तोफ आणि गोळ्यांचा वापर केला जाऊ लागला असल्याचे सांगितलं जात आहे.