उटावा : अवघ्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता जगावर नवं संकट आलं आहे. कॅनडात एका गूढ आजारानं डोकं वर काढलं आहे. ४० पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संकट सरलेलं नाही तोपर्यंत हे दुसरं संकट आल्यानं जगभरात चिंता वाढली आहे. दरम्यान, कॅनडातील अनेक तज्ज्ञ हा मॅड काऊ (Mad Cow) डिसीज असल्याचा दावा करत आहेत.
जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूची साथ काही लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, त्यातच आणखी एक संकट जगावर घोंघावायला लागलं आहे. एका गूढ आजारानं डोकं वर काढलं आहे.
मॅड काऊ नावावरूनच हा आजार गायीशी संबंधित असावा असा तर्क केला असेल, तर तो बरोबर आहे. गाय आणि तिच्यासारख्या पाळीव प्राण्यांमध्ये आढळणारा हा रोग आहे. या आजाराचं दुसरं नाव Bovine spongiform encephalopathy (BSE). हा गंभीर न्यूरॉलॉजिकल आजार आहे. Prion नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. एका विशिष्ट प्रोटीनमुळे हा रोग होतो. हा एक न्युरॉलॉजिकल रोग आहे. यामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याचे हाड नष्ट होते.
४० पेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडात या अज्ञात आजाराने थैमान घातलं आहे. सध्या डॉक्टर्स या रहस्यमय आजाराचा संबंध एका मेंदूच्या आजाराशी जोडत आहेत. अशा प्रकारच्या आजारांना क्रुत्झफेल्ट जॅकोब डिसीज अर्थात सीजेडी म्हणून ओळखलं जातं. कॅनडातील अनेक तज्ज्ञ हा मॅड काऊ (Mad Cow) डिसीज असल्याचा दावा करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२०१५ मध्ये क्रुत्झफेल्ट जॅकोब डिसीज अर्थात सीजेडी या आजाराचा सगळ्यात पहिला रुग्ण आढळला होता. त्या वेळी या आजाराचे ५ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षी या आजाराचे २४ रुग्ण आढळले होते. आता २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक संख्येनं रुग्ण आढळले आहेत. कॅनडातील बर्टरेंड शहराचे महापौर वोन गोडिन यांनी सांगितलं की, कोरोनानंतरच लोक या गूढ आजारानं त्रस्त झाले आहेत.
* ही आहेत लक्षणे
मेंदूतील पेशींवर हल्ला करणाऱ्या या आजाराची लक्षणं या पेशींचं बरंच नुकसान झाल्यावर दिसायला लागतात. जर योग्य उपचार झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू होतो. लक्षणं दिसायला १ ते २ वर्षे लागतात. माणूसाचा स्मृतिभ्रंश होतो, त्याच्या शरीरावरचं नियंत्रण कमी होतं आणि शेवटी शरीराचं संचालन करणारी यंत्रणाच निकामी होते.
हा आजार झालेली व्यक्ती गोष्टी विसरू लागते. तिला भ्रम होऊ लागतो. अंग दुखी, स्नायू आखडणे अशी लक्षणेही आढळतात. १८ ते ३६ महिन्यांच्या कालावधीत रुग्णांना जिथं मेंदूला ताण द्यावा लागतो अशी कामं करण्यात अडचणी येऊ लागतात. ताकद कमी होण्यासह दाताच्या दुखण्याच्या तक्रारीही सुरू होतात.