नवी दिल्ली : जगभरातला पहिलाच अजुबा असेल असा प्रकार इराकमधील मोसुल शहरामध्ये घडला आहे. येथे एका मुलाचा जन्म तीन लिंगासह झाला आहे. हा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्याला वैद्यकीय भाषेत ट्रिपहेलिया म्हणतात. तीन महिन्यांच्या मुलाला त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सूज आल्याची तक्रार डॉक्टरांकडे आली असता ही बाब उघडकीस आली. दरम्यान, मुलाला पाहिल्यानंतर, डॉक्टरांना दिसले की त्याला एक नाही, तर तीन लिंग आहेत.
एक बाळ एक नव्हे, दोन नव्हे तर तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर म्हणाले की अशा प्रकारची केस त्यांनी पहिल्यांदाच पाहिली आहे. या बाळाचा जन्म इराकच्या उत्तर भागातील मोसुलमध्ये झाला आहे. जगात एकूण 50 ते 60 लाख बाळांच्या जन्मामध्ये अशी केस पाहायला मिळते. त्यात सुद्धा त्या बाळाला 2 गुप्तांग असतात. 3 गुप्तांगासोबत जन्म झालेल्या या बाळाची केस पहिलीच आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधरणतः जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या हाताच्या नाहीतर पायाच्या बोटांची संख्या वाढते. मात्र या घटनेमध्ये बाळाच्या चक्क प्रायवेट पार्टची संख्या वाढली आहे. या बाळाचे 2 गुप्तांग 2 सेमी लांब आहेत तर एक गुप्तांग 1 सेमी लांब आहे. तसेच हे मुख्य गुप्तांगाला जोडून आले आहेत. या कारणामुळे या बाळाला कोणत्याही शारीरिक कार्यात भाग घेता येणार नाही.
डॉक्टरांच्या मते असं होण्यामागचं कारण एकतर प्रेग्नेंसीदरम्यान एखाद्या अडचणीमुळे नाहीतर अनुवंशिक गोष्टीमुळे असेल. मात्र बाळाला असलेल्या 3 गुप्तांगांपैकी 2 गुप्तांग ऑपरेशन करुन काढता येऊ शकतात. याला ‘सुपरनूमेररी’ असं म्हणतात. यामध्ये बाळ 2 गुप्तांगासोबत जन्माला येते. 3 गुप्तांगासोबत जन्माला आलेलं हे बाळ दुर्मिळ असून ही आजपर्यंतची पहिली घटना आहे.