मुंबई : मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. त्यातच मुंबईत आज (3 एप्रिल) कोरोनाचे 9090 रूग्ण आढळले तर 27 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 4,41,282 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 11,751 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 3,66,365 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 62,187 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
लोक ऐकत नाहीत मी दररोज लोकांमध्ये जावून आवाहन करतोय. पुढील दोन दिवस सुद्धा प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेसची भूमिका लॉकडाऊन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, अशी हतबलता अस्लम शेख यांनी व्यक्त केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईत लॉकडाऊन लावण्याची सरकारची आणि माझी स्वत:ची मानसिकता नाही. पण जर लोकांच्या जीवाचा प्रश्न आला की आमच्याकडे पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहे. मी आज, उद्या दररोज मार्केटमध्ये जाऊन निवेदन देणार. शेवटपर्यंत प्रयत्न करु, लोकांना आवाहन करु आम्हाला मजबूर करु नका असं आवाहन करणार, असं अस्लम शेख म्हणाले.
मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’अर्थात पार्सलची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स 15 दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल. इतकंच नाही तर रेल्वेसेवा आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवली जाईल, असं अस्लम शेख म्हणाले होते.
* आता मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख
यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. लोक ऐकत नाहीत मी दररोज लोकांमध्ये जावून आवाहन करतोय. पुढील 2 दिवससुद्धा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसची भूमिका लॉकडाऊन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, असे अस्लम शेख म्हणाले.