मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच राजामौली यांनी आरआरआरचे नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स पेन स्टुडिओला विकले आहेत. 200 ते 210 कोटी रुपयांचा हा करार झाला आहे. हा चित्रपट 1900 च्या दशकावर आधारित असणार आहे. दरम्यान, यात ज्यूनियर एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दक्षिण इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आपल्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अजय देवगणचा या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.
ज्यामध्ये अजय देवगण दमदार स्टाईलमध्ये दिसला आहे. अशा परिस्थितीत आता एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’चे नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स पेन स्टुडिओला विकल्याचे समोर आले आहे.
या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रॉडक्शन हाऊसद्वारेच प्रदर्शित केली जाईल. ‘बाहुबली’ नंतर एस.एस. राजामौलीचा हा दुसरा चित्रपट आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तसेच, जयंतीलाल गडा यांनी 1900 च्या दशकावर आधारित या चित्रपटाचे सर्व भाषांमधील इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सॅटेलाईट अधिकार खरेदी केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.
पिंकविलाच्या अहवालानुसार एस.एस. राजामौली आणि जयंतीलाल गाडा यांच्यात नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्ससाठी विशेष करार झाला आहे. बॉलिवूड स्टुडिओने हिंदी डब सॅटेलाईट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक हक्क यासह सुमारे 200 ते 210 कोटी रुपयांच्या करारास अंतिम मान्यता दिली आहे. व्यापारिक स्त्रोतानुसार जयंतीलाल गडा यांनी हिंदी आवृत्तीच्या सॅटेलाईट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक हक्कांमध्ये 50% भागीदारी घेतली आहे. याचा अर्थ असा की, जर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींची कमाई केली, तर जयंतीलाल यांना थेट 50 कोटी मिळतील.
या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती, परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे.