मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच राज्यात आज (४ एप्रिल) कोरोनाचे तब्बल ५७,०७४ रूग्ण आढळले आहेत तर २२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात आज २७, ५०८ रूग्ण बरे झाले आहेत. आता एकूण रूग्णसंख्या ३०,१०,५९७ वर पोहचली आहे. आतापर्यंत बरे झालेले रूग्णसंख्या २५,२२,८२३ तर आतापर्यंत मृत्यू झालेले रुग्ण ५५,८७८ इतके आहेत. ॲक्टिव्ह रूग्ण ४,३०,५०३ एवढे आहेत.
राज्यात दररोज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा कमालीची वाढत असून आज पुन्हा एकदा नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत तो ५० हजारांच्या आसपास सरकू लागला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७, हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३७ हजार ८२१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहचली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज राज्यात एकूण २७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३७ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्क्यांवर आले आहे.
* राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांच्या पुढे
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३ हजार ५९९ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६० हजार ८४६ इतका आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५२ हजार ४०८ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४८ हजार ६६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजार ५१२ इतकी आहे.
* मुंबईत कोरोनाचा स्फोट ; १११६३ रूग्ण आढळले
मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. त्यातच मुंबईत आज (४ एप्रिल) कोरोनाचे १११६३ रूग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ४,५२,४४५ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ११,७७६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ३,७१,६२८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ६८,०५२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
* नागपुरात कोरोनाचे ४११० रूग्ण आढळले
नागपुरात मागील चोवीस तासात कोरोनाचे ४११० रूग्ण आढळले तर ६२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,४१,६०६ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ५,३२७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात आतापर्यंत १,९४,९०८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ४१,३७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.