नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती खाली येण्यास सुरूवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ते आणखी कमी होतील, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाची किंमत कमी होईल तेव्हा आम्ही ग्राहकांना पूर्ण लाभ देऊ, असं आम्ही म्हटले होते. वचन दिल्याप्रमाणे आम्ही ग्राहकांना लाभ देणे सुरू केले आहे, असंही ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संकटामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि इंधनाचे चढे दर अशा कात्रीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली घसरतील, असे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
आज रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर आता कमी व्हायला सुरुवात होईल. आगामी काही दिवसांमध्ये ते दिसून येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर घसरल्यानंतर आम्ही त्याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करायला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम आता दिसून येतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. त्यामुळे कोरोना संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.