मुंबई : काल सोशल मीडियावर नगर जिल्ह्यातील या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो वायरल झाला. आगीमुळे घरातील साहित्यासोबत या मुलाची सायकलही जळून खाक झाली होती. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातर्फे कुटुंबांना तात्पुरती मदत आणि त्या चिमुकल्याला नवीन सायकल पाठविण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील हातावर पोट भरून संसाराचा गाडा चालवित असतानाच अचानक घरांना आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्यासह चिमुकल्याच्या आवडत्या सायकलचा सांगाडा झाला. आई – वडिल घराची राख झाल्याने हताश झाले असतानाच चिमुकला मात्र सांगाडा झालेल्या सायकलकडे निशब्द होऊन बघत बसला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक होते. सोबतच होते चिमुकल्याच्या सायकलची वाईट अवस्था. आपली लाडकी सायकलचा जळाल्याचे बघून निशब्द झालेल्या चिमुकल्याला राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी समर्थ साद घातली आहे.
काल सोशल मीडियावर नगर जिल्ह्यातील या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो दिसला. आगीमुळे घरातील साहित्यासोबत या मुलाची सायकलही जळून खाक झाली होती. प्रहारतर्फे त्या कुटुंबांना तात्पुरती मदत आणि त्या चिमुकल्याला नवीन सायकल दिली. या कुटुंबांना उभे करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी मदत करणार. pic.twitter.com/l6tqX28uwn
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) April 4, 2021
समाजमाध्यमांवर हे छायाचित्र झळकताच राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी त्या कुटुंबियांना संपूर्ण मदत करीत चिमुकल्याच्या भावनांना साद घातली व सायकल सुद्धा चिमुकल्यासाठी रवाना करीत औदार्याची भूमिका बजावली. प्रहारचे अहमदनगर येथील पदाधिकारी यांनी आज रविवारी (ता,4) तातडीने सर्व साहित्य घेऊन कोभाळणे येथे दाखल झाले. त्यांनी घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने प्रदान करीत कुटूंबियांना आणखी मदतीचा शब्द दिला.