मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत मोठे योगदान होते. त्यांनी तब्बल 100 चित्रपटांमध्ये काम केलं. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज वृद्धपकाळाने वयाच्या 88 व्या वर्षी निझन झाले. आज 12 वाजता त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फिल्मफेअर मासिकाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
शशिकला यांचं खर नाव शशिकला जवळकर होतं. त्या मूळच्या सोलापूरच्या शशिकला यांनी बॉलिवूडमध्ये नायिका व खलनायिका असा दोन्ही भूमिका केलेल्या आहेत. वयाच्या सातव्यावर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली.
Padma Shri Awardee, Two times Filmfare Award winner (Best supporting Actress for #Aarti and #Gumrah)
More than 100 films and a number of TV serials. A career spanning of 6 decades. 80s family dramas will always be remembered for her.
Rest in Peace Shashikala Ji. pic.twitter.com/QACcTxtJiR
— CinemaRare (@CinemaRareIN) April 4, 2021
शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिला ओमप्रकाश सैगल बनल्या. १९४७च्या जुगनू चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली.
मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली आरती चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. या भूमिकेमुळे शशिकला यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढून या भूमिकेसाठी तयार केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात खलनायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या. ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत शशिकला यांनी प्रेमविवाह केला. शशिकला यांना दोन मुलीही आहेत.
* शशिकला मूळच्या सोलापूरकर
शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिला ओमप्रकाश सैगल बनल्या.
* शशिकला यांनी अभिनय केलेले चित्रपट
ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांनी 100 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी, अशा चित्रपटांत त्यांनी काम केलं.