मुंबई : मलबार हिलमध्ये तब्बल 1 हजार कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे. 31 मार्चला डी-मार्ट सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी हे घर विकत घेतलंय. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज इमारतीत हे घर आहे. यासाठी दमानींनी तब्बल 30 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरलीय. बाजारभावानुसार या घराची किंमत 724 कोटी रुपये आहे. 5752.22 चौरस फुटांच्या घराचा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.
एक गुंतवणूकदार ते यशस्वी उद्योजक असा प्रवास असलेले डी मार्टचे राधाकिशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर घेतलं आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस मीटरचं हे अलिशान घर आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी पुरचंद रॉयचंद अँड सन्स, परेशंद रॉयचंद अँड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स यांच्याकडून हे घर खरेदी केलं. या घराचं बाजार मूल्य 724 कोटी रुपये आहे. त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत 1 हजार कोटीच्या घरात जाते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 12 हजार कोटी इतकी आहे. राधाकिशन दमानी हे नेमही पांढऱ्या कपडे परिधान करतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये ते ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी 1999 मध्ये रिटेल बिझनेस सुरु केला होता, त्यावेळी कुमार मंगल बिर्ला आणि फ्युचर ग्रुपचे किशोर बियानींची पावलं इकडे वळलीही नव्हती. राधाकिशन दमानींचा प्रमुख सल्ला म्हणजे, कोणत्याही कंपनीची नेहमी कर्जाची रक्कम तपासा, तसंच अल्पकाळासाठी पैसे गुंतवणे टाळा.
राधाकिशन दमानी यांची सुरुवात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीने झाली. मात्र एका आयडियाने त्यांचं आयुष्य बदललं. केवळ 24 तासात त्यांचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले.
राधाकिशन दमानी यांच्या बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता. मात्र त्यात काही परवडत नसल्यामुळे तो बंद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु केली. चांगल्या संधी शोधून छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु केली.
वर्ष 1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी कमावले होते. त्यानंतर त्यांनी किरकोळ व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य 1.88 लाख कोटी रुपये आहे.