मुंबई : राज्यात आता लॉकडाऊन जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली. वाईन शॉप बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर रांगा लावल्या होत्या. यावेळी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आता लॉकडाऊन जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. हा इशारा आणखी कोणी गंभीरपणे घेतला की माहिती नाही पण मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिवसभरात व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊनची छाया आणखी गडद झाली होती. त्यामुळे शनिवारी रात्री नालासोपाऱ्यात ‘वाईन शॉप’बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर रांगा लावल्या होत्या. नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा परिसरातील हे दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर अशाप्रकारे गर्दी आणि गोंधळ उडण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. मात्र, यावेळी महाराष्ट्रात कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींनी गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून अगोदरच स्टॉक खरेदी केला.