मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. ‘राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं’, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना केलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मनसेचा लॉकडाऊनला पाठिंबा; केलं ‘हे’ आवाहन
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केला.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे मनसेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर मनसेने सरकारी सूचनांचं पालन करावं, असं आवाहन केलंय.