मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार. शुक्रवार (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 12 एप्रिल सकाळी 7 पर्यंत विकेंड लॉकडाऊन असेल. केवळ अत्यावश्यक सेवा आणि परिवहन सेवा सुरु राहतील. राज्यात उद्यापासून (5 एप्रिल) कडक नियम लागू होणार. रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 पर्यंत संचारबंदी राहणार आहे.
राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.
राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई : राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवारी आणि रविवारी कडकडीत बंद #lockdown #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #saturday #sunday #stop #weekend #विकेंडलॉकडाऊन pic.twitter.com/U8OM5jlwIk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 4, 2021
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाऊनची नियमावली उद्या रात्री 8 वाजता जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
* निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा
निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केलीय, असं मलिक म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंधू राज ठाकरेंना केला सहकार्यासाठी फोन https://t.co/qc72MgPQsf
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 4, 2021
तसेच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोना वाढत असताना एकजुटता दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
* असा असेल लॉकडाऊन
> उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू
> रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी
> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू
> सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार
> इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
> बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार
> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय
> शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार